जनतेज न्युज

मिशन 500 कोटी लिटर जलसाठा अभियानास प्रतिसाद.

प्रतिनिधी, बुलढाणा : ई डी, आय आर एस उपायुक्त डॉक्टर उज्वल कुमार चव्हाण यांच्या प्रेरणेतून संयुक्त आयकर आयुक्त राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा तालुक्यातील नांद्राकोळी येथे मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियान राबविण्यात येत आहे. रोटरी क्लब चेंबूर मुंबई, केडाई ग्रुप पुणे, यांच्याकडून डिझेल टाका मशीन वापरा या तत्वावर पोकलॅन्ड आणि जेसीबी च्या सहाय्याने नांद्राकोळी गावातील नदी खोलीकरण, रुंदीकरण सुपीक गाळ शेतात टाकण्याची कामे, स्वयंसेवक, सरपंच, गावकरी, शेतकरी बांधव यांनी लोकसहभागातून हे अभियान राबवायला सुरुवात केली आहे… स्वयंस्फूर्तीने गावकरी यामध्ये सहभागी झाले असून, या अभियानाला जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी भेट देऊन पाहणी केली, त्याचबरोबर कृषी विभागांतर्गत बीज पेरणी, प्रात्यक्षिक, रुंद वरंबा व सरी पद्धत या प्रात्यक्षिकाची देखील त्यांनी पाहणी केली, आणि यानंतर मिशन पाचशे कोटी लिटर जलसाठा अभियानाची गाव सभा घेण्यात आली.