प्रतिनिधी, अमरावती : गेल्या वर्षी अतिपावसामुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पिकांचे नुकसान झालं जिल्ह्यातील दर्यापूर येथे उडीद व मूग पीक पूर्णता अति पावसामुळे वाया गेले. शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकाचा विमा काढलेला होता परंतु एक वर्ष होऊनही शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्याने संतप्त झालेले शेतकरी आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख गोपाला अरबट हे पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला (नितीन सावळी) जाब विचारला असता उडवाउडवीचे उत्तर दिल्याचे त्याच्या कानशिलात लगावली तसेच जोपर्यंत पिक विमा मिळत नाही तोपर्यंत जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयातून निघणार नाही अशी भूमिका शिवसैनिक व शेतकऱ्यांनी घेतली गेल्या दोन तासापासून अमरावतीच्या जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात शिवसैनिक व शेतकऱ्यांचा हे आंदोलन सुरू आहे.
