जनतेज न्युज

कुजलेल्या मृत देहा शिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात जळगाव पोलिसांना यश मिळाले आहे

प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वांजोळा गावा लगत कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारावर पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पाहणी केली असता मृत देह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता,या ठिकाणी केवळ सांगाडा शिल्लक असल्याने पहिल्यांदा मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांच्या समोर होते,मृत देहाची चप्पल आणि त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांच्या माध्यमातून पोलिसांनी मयताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला होता,याच दरम्यान जिल्ह्यात हरविलेल्या व्यक्तीची माहिती घेण्यास सुरुवात केली असता ,भुसावळ शहरात रामदेव बाबा नगर भागात राहणाऱ्या रोहित कोप्रेकर हा तरुण आठ दिवस पासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या कुटुंबाने पोलिसात दिली होती.

या तक्रारीचा आधार घेत पोलिसांनी रोहित याचे कपडे आणि चप्पल च्यां माध्यमातून मृतदेह हा रोहित कोप्रेकार याचाच असल्याचं निष्पन्न केले होते,रोहित चां मृत देह ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी रक्ताने माखलेले दगड आणि कपडे ही आढळून आल्याने रोहित चां खून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला होता,मृत देह पूर्णपणे कुजला असल्याने पोष्ट मार्टिम मध्ये कारण स्पष्ट होणे कठीण होते
मयत रोहित याचा खून झाला असला तरी तो कोणी आणि का केला या बाबत कोणताही ठोस पुरावा समोर नसल्याने पोलिसांना त्याचा तपास करणे मोठे आव्हान होते.

ज्या भागात मयत रोहितचा मृत देह आढळून आला होता त्या भागात असलेल्या हॉटेल मधील सीसी फुटेज पोलिसांनी तपासणी केली असता,रोहित बेपत्ता झाल्या दिवशी त्याच्या सह अन्य दोन तरुण एका हॉटेलात दारू पीत असल्याचं फुतेज मध्ये मिळून आले होते हाच धागा पकडून पोलिसांनी या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली असता आणि पोलिस खाक्या दाखविला असता,त्याच्या दोन मित्रांनी दोरीने गळफास देऊन त्याची हत्या केल्याचं कबूल केले.

अद्याप या घटने मागील कारणा चां पोलिस तपास करीत असले तरी प्रेमाच्या त्रिकोनातून हा प्रकार घडला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यात रोहित यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे. कुजलेल्या मृत देह शिवाय कोणताही ठोस पुरावा नसताना चोवीस तासाच्या आत आरोपी अटक करण्यात यश मिळाल्याने शोध घेणाऱ्या पोलिसांना पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी बक्षीस जाहीर केले आहे.