प्रतिनिधी, बुलढाणा : खामगाव शहराबाहेरील नांदुरा रोडवर असलेल्या तुलसी कृपा ऍग्रोटेक कंपनी मध्ये आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये कपाशीच्या गठानी आणि बारदाना संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये कोट्यावधी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.तुलसी कृपा ऍग्रोटेक कंपनी च्या गोडाउन मध्ये कपाशी पासून तयार करण्यात आलेल्या रुईच्या कठाणी आणि बारदाना ठेवण्यात आलेला होता. या गोडाऊनला सकाळी 10 वाजेच्या सुमारास अचानकपणे भीषण आग लागली. या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती खामगाव नगरपालिका व परिसरातील नगरपालिकांच्या अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनांनी घटनस्थळी पोहचून आगीवर पाण्याचा मारा करीत आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत संपूर्ण गठानी आणि बारदाना जळून खाक झाल्या होत्या ज्या ठिकाणी या रुईच्या गठानी ठेवण्यात आल्या होत्या त्या गोडाउन मध्ये विद्युत पुरवठा ही नसताना आणि चारी बाजूने सिमेंटच्या भिंती असताना आग लागली की लावण्यात आली याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आहे.
