प्रतिनिधी, कल्याण डोंबिवली : वृक्षतोडीमुळे कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचा तुडवडा निर्माण होत आहे. त्यात आज वटपौर्णिमा हा सण आहे. या निमित्तने कल्याण मध्ये 500 सोसायटीतील महिलांना वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले आणि वडाच्या रोपाचे संगोपन करण्याचे आवाहन शिव आदेश प्रतिष्ठाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन महिलांनी वडाच्या झाडाजवळ गर्दी न करता आपल्या सोसायटीतच वडाच्या रोपाची पूजा करावी. वाटप केलेल्या रोपाचे योग्य संगोपन करून वृक्षलागवडीसाठी प्रयत्न करावे व कोरोना काळात कित्येक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी जीव गेला आहे. आता पुन्हा कोरोना डोके वर काढत आहे या मुळे भविष्यात ऑक्सिजनचा तुडवडया मुळे कोणाचे जीव जाऊ नये, यासाठी शिव आदेश प्रतिष्ठाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वटपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या परिसरातील 500 सोसायटीतील महिलांना वडाची झाडे भेट दिली आहेत. तर सोसायटी मधील महिला भगिनींनी या वृक्षांचे रोपण करत वटपौर्णिमेचा सण या वृक्षाची पूजा करून साजरा करणार असल्याचे आश्वासन दिले. यामुळे वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडांची होणारी तोडमोड मोठ्या प्रमाणावर रोखता येणार असून निसर्गाचे संरक्षण करण्यास हातभार लागणार आहे.
