जनतेज न्युज

२ देशी कट्टया सह ४ आरोपी अटक दोन देशी बनावटी पिस्टल,सहा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी, बुलढाणा : जामोद – बर्‍हाणपूर मार्गावर नाकाबंदी दरम्यान जळगाव जामोद पोलिसाच्या पथकाने एका कारची झडती घेतली असता त्यात २ देशी कट्टे आढळून आले. या वाहनात बसलेल्या ४ जणांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहे. चारही आरोपी सातारा जिल्ह्यातील असून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केल्याची माहिती जळगाव जामोदचे ठाणेदार अनिल अंबुलकर यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यात सर्वच ठिकाणी अचानकपने नाकबंदी करण्याचे आदेश असतांना त्या अनुशंगाने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास जळगांव जामोद ते ब-हाणपुर रोडवर निमखेडी फाटयावर एक लालरंगाची तवेरा गाडी जात असतांना त्याला थांबवून पोलिसांनी विचारपूर आणि वाहनांची तपासणी केली असता वाहनातून २ देशी बनावटीचे पिस्टल मिळून आले. गाडीमध्ये परशुराम रमेश करवले वय 23 रा. सोमवार पेठ कराड जि.सातारा , अभिजित दिलीप येडगे वय 19 रा. अहिल्ल्यानगर मलकापुर ता कराड जि. सातारा , दिनेश विजय बुरूंगले वय 22 रा.सातारा, कुनाल बाबुराव हिवरे वय 23 रा. रेहटे ता कराड जिल्हा सातारा हे हजार होते. पोलिसांनी त्यांचे ताब्यातुन दोन देशी बनावटीचे पिस्टल, मोबाईल एक तवेरा गाडी क्र. एमएच ११ एल ९५९४ असा एकुण ६०१५००/-रू चा माल मिळुन आला.