जनतेज न्युज

शहरात पेट्रोल खरेदी करताना आता वाहनचालकांना वाहन क्रमांक व मोबाईल क्रमांक द्यावे लागणार पेट्रोल पंपावर

50 रुपयांच्या खालची विक्री होऊ शकते बंद; पेट्रोल पंप चालक-मालक संघटनेची माहिती

प्रतिनिधी , औरंगाबाद : आज रोजी औरंगाबाद शहरातील पेट्रोल चालक-मालक संघटनेच्या वतीने माहिती देण्यात आली की पेट्रोल कंपनी यांच्यावतीने नवीन नियमावली तयार करण्यात आली असून त्या अनुषंगाने राज्यात इतर शहरात पेट्रोल खरेदी करताना वाहनचालकांना त्यांचा वाहन क्रमांक आणि मोबाईल क्रमांक पेट्रोल पंप वरती देणे व 50रुपयाचृयावर पेट्रोल भरणे बंधनकारक राहणार आहे सदरील योजना महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली असून आता ही लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे, सध्या यासंदर्भात औरंगाबाद जिल्ह्यात असे आदेश आले नसल्याचे क्रांती चौक येथील एचपी पेट्रोल पंपाचे मालक व असोसिएशन डीलर अंबादास यांनी दिली आहे  मात्र धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यांमध्ये ही योजना सुरू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात ही नियमावली लागू होऊ शकते  अशी माहिती पेट्रोल पंप चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अब्बास यांनी सदरील माहिती आज रोजी दिली आहे.