जनतेज न्युज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी मनसैनिकांनी केला शिवमंदिरात महाअभिषेक

प्रतिनिधी, बीड : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दिर्घआयुष्यासाठी बीडमध्ये मार्कंडेश्वर शिवमंदिरात महाअभिषेक घालण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या वर शस्त्रक्रिया होणार असून तत्पूर्वी राज्यात ठीक ठिकाणी राज यांच्या दीर्घायुष्यासाठी अभिषेक करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बीडमधील मनसैनिकांनी शहरातील मार्कंडेश्वर शिवमंदिरात महाअभिषेक घालून राज ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले आहे. यावेळी मनसैनिकांसह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.