जनतेज न्युज

अग्निपथ`ला शिरपूरातही विरोध, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

प्रतिनिधी, धुळे : चार वर्षातच ऐन उमेदीत तरुणांना पुन्हा बेकार करणाऱ्या भाजप केंद्र सरकारच्या `अग्निपथ` या कंत्राटी लष्करी भरतीला देशभरात मोठा विरोध सुरु झाला आहे. त्यातही उत्तरेकडील १३ राज्यात त्यावरून आगडोंब उसळला आहे. हा विरोध आता महाराष्ट्रातही सुरु झाला असून युवक राष्ट्रवादी त्या विरोधात सोमवारी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिनेश मोरे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिरीष पाटील, राष्ट्रवादीचे किसान सेल अध्यक्ष कांतीलाल पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष आशिष कुमार अहिरे यांच्या नेतृत्वात शिरपूर तालुका राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी उपविभागीय कार्यालय शिरपूर येथे निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

एक स्वाभाविक प्रश्न उपस्थित राहतो चार वर्ष सेवा केल्यावर त्यांना संधी काय? आणि यांचं  भवितव्य पूर्ण अंधारामध्ये होणार आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने हे आंदोलन करुन हे सांगू इच्छितो की या योजनेचा पुनर्विचार करावा, असे युवक राष्ट्रवादीचे युवा काँग्रेस अध्यक्ष आशिष कुमार अहिरे म्हणाले.

केंद्र सरकारने सैन्य दलात युवकांना संधी मिळावी, यासाठी अग्निपथ ही योजना अंमलात आणली आहे. मात्र या योजनेला बिहारमधील युवकांनी जोरदार विरोध केला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून बिहारसह इतर राज्यातही तरुणांनी या योजनेच्या निषेधार्थ एल्गार आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून संतप्त युवकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ करून रस्त्यावर टायर पेटवून दिले. यूपी, बिहार, हरियाणा, हिमाचल, उत्तराखंड, राजस्थानसह 13 राज्यांमध्ये हिंसाचाराचा वणवा पोहोचला आहे. बिहार आणि नंतर उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक गोंधळ पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रातील तरुण देखील पेटून उठेल, तरी केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय त्वरित पुनर्विचार करावा अशी मागणी शिरपूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे करण्यात आली. यावेळी निलेश गरुड, अभय करंकाळ, कुबेर राजपूत, भावेश शिरसाट, सचिन कोळी, गौतम थोरात, संजय पवार, विकास साबळे, संभाजी पाटील, वाजिद शेख, पवन सोनवणे, बाळकृष्ण पाटील, ईश्वर पावरा ,जयेश पाटील, अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.