प्रतिनिधी, औरंगाबाद : आज सोमवार २० जून रोजी औरंगाबाद शहरातील क्रांती चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने अग्निपथ योजनेसंदर्भात घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात मोठे आंदोलन करण्यात आले आहे.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष मयूर सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने क्रांती चौकात आंदोलनासाठी जमा झाले होते. केंद्र शासनाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिली आहे.अग्निपथ योजनेमुळे देशातील तरुणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल सदरील देशातील सर्व तरुणांचा विचार करून केंद्र शासनाने अग्निपथ योजनेसंदर्भात घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलनाच्या माध्यमातून केली असून सदरील आंदोलन क्रांती चौकात संपन्न झाले आहे.यावेळी पोलिस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीचौक पोलीस आणि पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून मोठा बंदोबस्त क्रांती चौक परिसरात लावण्यात आला होता
