जनतेज न्युज

पनवेल मध्ये महानगर गॅसला गळती

प्रतिनिधी, पनवेल : पनवेल मध्ये महानगर गॅसला गळती झाली असून,मागील 20 मिनिटांपासून ही गळती चालू होती.पनवेल महानगर पालिकेच्या माध्यमातून नाले सफाई करताना जेसीबी चा फावडा या पाइप ला लागल्याने हा पाईप फुटला, ज्यामुळे मोठी घटना होऊ शकली असती. मात्र, पनवेल अग्निशमन दल आणि महानगराची आपत्कालीन व्यवस्थापन तिथे पोहचले असून आता गॅस बंद करण्यात आले आहे. आणि पाइप जोडण्याचे काम सुरू असून, पुढील दोन तासात लाईन पूर्ववत येणार असल्याचे महानगर गॅस च्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. तर अग्निशमन विभागाने आम्हाला समजल्यावर आम्ही आलो, इथे कोणतीही जीवितहानी झाली नाही, गटाराचं काम सुरू असल्याने हे झालं असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र पूर्ण पनवेल शहरात ही लाईन पसरली असून त्या पाइप वर कोणतेही आवरण नसल्याने वारंवार अशा घटना घडत आहेत.