प्रतिनिधी, बीड : बीडमध्ये खाजगी तसेच इंग्रजी माध्यम चालकांकडून पालकांची आर्थिक लूट केली जाते आणि याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सामाजिक कार्यकर्त्यांनी शिट्टी वाजवा हे अनोखं आंदोलन केले आहे. डोनेशन तसेच शुल्कवाढ कायद्यांचे उल्लंघन करून पालकांची आर्थिक लूट करणाऱ्या संस्था चालकांवर गुन्हे दाखल करा. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या अडीच कोटी अखर्चित निधी संदर्भात जबाबदार शिक्षणाधिकारी तसेच कंत्राटदार प्रशासकीय कारवाई करा यासह विविध मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान यावेळी शिक्षण विभागाला मोतीबिंदू झालाय का? असा प्रश्न उपस्थित करून डोळ्यांवर काळे चष्मा घालून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
