जनतेज न्युज

चैन स्नॅचिंगं, रॉबरी व चोरीच्या पाच गुन्ह्यांची उकल, कळवा पोलिसांची कामगिरी

प्रतिनिधी, ठाणे : आनंद नगर कळवा पूर्व येथे राहणाऱ्या सिद्धेश पंढरीनाथ धुरी यांना खारेगाव ब्रिजच्या मधोमध खारेगाव कळवा येथून पायी चालत घरी जात असताना अनोळखी चार आरोपींनी त्यांना वाटेत अडवून त्यांना मारहाण करून मोबाईल फोन व रोख रक्कम असा 6,500 रुपये किंमतीचा माल चोरून नेला. या प्रकारणाने घाबरलेल्या सिद्धेश धुरी याने कळवा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्या प्रमाणे 394 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

वरील गंभीर गुन्ह्यांची दखल घेऊन व या अगोदर दाखल झालेल्या चैन स्नॅचिंग केसेस बद्दल पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी आपले अधिकारी पोलीस निरीक्षक सुदेश आजगावकर, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक किरण बघडाणे, साहाय्यक पोलीस उप निरीक्षक मंगेश महाजन व स्टाफ यांना सूचना दिल्या. त्या प्रमाणे गुन्हे पथकातील स्टाफ खारेगाव येथील नवीन ब्रिजवर पेट्रोलिंग करत असताना तिन इसम संशयितरित्या फिरत असताना दिसले. त्यांना हटकले असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले, म्हणून त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफिने  पकडले. त्यांच्या कडील घातक लोखंडी तलवारीसह त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी गणपत पल्लानीस्वामी गुल्लर वय 21, अमन सुपूजन जैस्वाल वय 19 वय, हरिंदर परमहंस यादव वय 19, असल्याचे सांगितले. हे सर्व राहणार कळवा येथे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी वरील गुन्हा केल्याची कबुली दिली, तसेच त्यांनी कळवा त्यांनी कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत व राबोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्हे केल्याचे कबूल केले, त्यांच्या कडून 2 सोन्याच्या चैन, 1 सोन्याचे मंगळसूत्र,1 ऑटो रिक्षा, दोन काळ्या रंगाच्या बजाज कंपनीच्या पल्सर मोटारसायकली असा एकूण 3,30,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.