प्रतिनिधी, जालना : केंद्र सरकारच्या अग्निपथ या योजनेला देशा सह विविध राज्यात ज्या प्रमाणे विरोध सुरू आहे.त्याच पार्श्वभूमीवर जालना शहरात ही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या योजनेला विरोध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यानी शहरातील सुभाष चंद्र बोस चौकात एकत्र येत केंद्रसरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत देश सेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणाच्या भविष्याची राख रांगोळी करणारी ही योजना असल्याने केंद्र सरकारने या योजनेचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने करण्यात आली.या वेळी कार्यकर्त्यानी सुभाष चंद्र बोस चौकात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा जाहीर निषेध ही व्यक्त केला.अग्निपथ योजना जर मागे नाही घेतली तर या विरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा ही या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या देण्यात आला.
