प्रतिनिधी, सातारा : म्हाढा चे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना खोट्या गुन्ह्यात अडकून त्यांची बदनामी करणाऱ्या दिगंबर आगवणे यांच्यावरच पोलिसांनी चाप आवळला असून खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी त्यांच्यावर सातारा फलटण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेली ची माहिती भाजपचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.हे सर्व खोटे प्रकार राज्याचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरूनच केल्याचे समोर येत असल्याने आम्ही आता रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघडे करून त्यांची ईडीपेक्षा आणखीन कोणत्या मोठ्या चौकशी यंत्रणेकडून चौकशी करता येईल का याची मागणीदेखील कारण आसल्ल्याची माहिती अनुप शहा यांनी यावेळी बोलताना दिली आहे .
