प्रतिनिधी, कल्याण : लोकांचा लोकनाथ एकनाथ शिवसेनाप्रमुख स्व . बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात करणारे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे घेऊन जाणारे मा . श्री . एकनाथजी शिंदे साहेबांना मनापासून शुभेच्छा ! साहेब आगे बढो , हम आपके साथ है ! अशाप्रकारे मजकूर लिहिलेल्य बॅनर डोंबिवलीतील इंद्रा चौकात लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चौकाच्या बाजूलाच डोंबिवली शिवसेनेचे शहर शाखेचे कार्यालय असल्याने शिवसेना कार्यकर्त्याने पाठिंबा दर्शवला की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे
