जनतेज न्युज

नवीन पिढीने या राजकारण्यांकडून काय आदर्श घ्यावा?- रविकांत तुपकर

प्रतिनिधी, बुलडाणा : महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण नगरपालिका,ग्रामपंचायत पेक्षाही खालच्या स्तरावर. हे राजकारण किळसवाणे व विट आणणारे. नवीन पिढीने या राजकारण्यांकडून काय आदर्श घ्यावा? या सरकारचा शेवट होणार असेल तर.सरकारने जाता-जाता तात्काळ शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी करावी,कर्जमाफिस पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांत पैसे टाकावेत, विज बिल माफी करावी , पेरणीसाठी मोफत खते:बियाणे व पीक कर्जाचा तात्काळ जीआर काढावा, रेग्युलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान द्यावे. हे सर्व निर्णय रातोरात घेऊन सरकारने शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्यावे यातुन शेतकऱ्यांना ही सुकून मिळेल. व नेत्यांनाही शेतकऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी आज दिली आहे.