जनतेज न्युज

बुलडाण्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी

प्रतिनिधी, बुलडाणा : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेत उभी फूट पडली. त्यांच्यासोबत जवळपास 51 आमदारांनीही बंड केलं. त्या आमदारांसोबत बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर चे शिवसेना आमदार डॉक्टर संजय रायमुलकर व बुलढाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड हे सध्या गुहाटी ला आहे. या सगळ्यात पदाधिकारी मात्र आपली बाजू क्लिअर करायला मागे राहत नाहीत. काल शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थनात बॅनर लावण्यात आले होते ते बॅनर आज हटवून समोरच शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात “आम्ही शिवसेना सोबत काल – आज – उद्याही. अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आले आहे. बुलढाण्यात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ बॅनर लावण्यात आलेत हे विशेष.