जनतेज न्युज

संतश्रेष्ठ नामदेव महाराज पालखीचे जवळबन येथे जल्लोषात स्वागत

प्रतिनिधी, बीड : हिंगोली जिल्ह्यातील नर्सिंनामदेव महाराज पालखीचे बीडच्या केज तालुक्यातील जवळबन गावात वाजत गाजत जंगी स्वागत करण्यात आले.मराठवाड्यातील ग्रामीण भागातील पहिला अश्व रिंगण सोहळा या गावात संपन्न झाला. तर यावेळी फुगडी, वारकऱ्यांचे रिंगण अश्या विविध कार्यक्रमाने गावकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले गावात अगदी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.गावातील कैलास वासी निवृत्त सोपानराव करपे यांनी १९९५ साली संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या दिंडीला गावात सुरुवात केली ती आजतागायत सुरू आहे. कोरोनाच्या दोन वर्षाच्या खंडानंतर आज गावात दिंडीचे ठिक ठिकाणी स्वागत करण्यात आले आहे.गावातील हनुमान मंदिरात कीर्तन, भजन करून, महाप्रसाद घेऊन ही पालखी पुढे युसुफवडगाव येथे मुक्काम करणार असून शुक्रवारी पंढरपूरसाठी मार्गस्थ होणार आहे.