जनतेज न्युज

दुर्गाडी किल्ला परिसरात हजारो मुस्लीम बांधवांचे नमाज पठण

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : कल्याण पश्चिम मधील दुर्गाडी किल्ला परिसरात एकच उत्साह दिसून आला सकाळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या परिसरात जमा झाले होते . यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले . एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी राष्ट्रीय शांतता आणि अखंडता कायम रहावी , अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांनी केली . त्यानंतर गळाभेट घेऊन लहान – मोठ्यांनी एकमेकांना ‘ ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या .दोन वर्षानंतर देशभरात रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी होत आहे . कोरोना निर्बंधांमुळे ईद साजरी करण्यावर मर्यादा होत्या . ईद निमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे नमाज अदा केली . दुर्गाडी किल्ला परिसरात उत्साह- कोरोना निर्बंधामुळे दोन वर्ष या ठिकाणी मुस्लिम बांधवांना नमाज अदा करता आले नाहीत . यंदा मात्र कोरोना रुग्ण संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथिल झालेत . त्यामुळे कल्याण पश्चिम मधील दुर्गाडी किल्ला परिसरात एकच उत्साह दिसून आला सकाळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या परिसरात जमा झाले होते . यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले . एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी राष्ट्रीय शांतता आणि अखंडता कायम रहावी , अशी प्रार्थना मुस्लीम बांधवांनी केली . त्यानंतर गळाभेट घेऊन लहान – मोठ्यांनी एकमेकांना ‘ ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या