प्रतिनिधी , जालना : आषाढी एकादशीनिमित्त आज जालना शहरात आनंदी स्वामी महाराजांची पालखी काढण्यात आली.आनंदी स्वामी मंदीरातून ही पालखी संपूर्ण शहरातून जाते.त्यामुळे शहरातील महिला पालखीचं औक्षण करून दर्शन घेतात.गेल्या 265 वर्षांपासून आषाढी एकादशीनिमित्त आनंदी स्वामी महाराजांची पालखी काढण्याची परंपरा आहे.या पालखीचं दर्शन घेण्यासाठी शहरातील ठिकठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती.आज सकाळपासून सुरू झालेल्या आनंदी स्वामींची पालखी दिवसभर शहरातील विविध भागातून फिरली.या वेळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक देखील उपस्थित होते.मुस्लिम धर्मीयाकडून देखील पालखीचे स्वागत करण्यात आलं.यावेळीं आनंदी स्वामी महाराजांची पालखीचे आणि पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांचा मुस्लिम धर्मियांकडून सत्कार देखील करण्यात आला.दरम्यान शहरातील नागरीकांनी आज एकता दाखवली असून अशीच एकता कायम असू द्या आणि पोलिसांना सहकार्य करा असं आवाहन पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी केलं आहे.
