प्रतिनिधी, लातूर : महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेला अन्नपदार्थ सुगंधी पान मसाला गुटखा वाहन क्रमांक एम.एच.४३ए ०१५० या इंडिगो कारमधून घेवून जात असल्याची गुप्त माहिती उदगीर शहर पोलिसांना मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शाहू चौक येथे सापळा रचून गुटखा घेवून जाणार्या इंडीगो कार ला पकडले असता त्यात गुटखा आढळून आल्याने कारचालकास उदगीर शहर पोलिस स्टेशन येथे आणून गुटखा जप्त करीत कारवाई कण्यात आली त्यात एक लाख पस्तीर हजार रुपयाच्या गुटख्यासह साठ हजाराची इंडीगो कार असा एकूण १ लाख ९५ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी आरोपिकडून जप्त केला आहे.असुन अन्न सुरक्षा अधिकारी विठ्ठल सटवाजी लोंढे यांच्या फिर्यादीवरुन गुटखा विकणार्या आरोपी विरुद्ध अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र मुंबई यांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीउदगीर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी दिली आहे.
