प्रतिनिधी , पुणे : गावात चिनी उत्पादने विकू नका, असा ठराव कोंडवे – दांडवे ग्राम सभेने बुधवारी मंजूर केला. असा ठराव करणारी ही देशातील पहिली ग्राम पंचायत आहे. भारत – चीन सीमेवरच्या गलवान खोऱ्यात चीनच्या सैनिकांशी झालेल्या चकमकीत भारताचे १० जवान शहीद झाल्यानंतर चीनच्या विरुद्व देशात संतापाची लाट उसळली असून चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची चळवळ देशात सुरू आहे.
ग्राम पंचायतने कामाच्या निविदांच्या अटीत स्पष्ट केले आहे की कोणत्याही सार्वजनिक निर्माण कामात चिनी उत्पादनांचा उपयोत करता येणार नाही. दुकानदारनाही चिनी उत्पादने विकू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी चिनी उत्पादनांची बहुसंख्या असणाऱ्या मोबाईल आणि स्टेशनरी-काम्पुटर हार्डवेअरच्या दुकानदारांना विशेष आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती सरपंच नितीन धावडे यांनी दिली.
उपसरपंच स्नेहल धावडे म्हणाल्या – हा ठराव एकमताने पारित करण्यात आला आहे. या विषयाला संवैधानिक दर्जा देण्यासाठी ग्राम सभेत ठराव पारित केला. यात आम्ही काही विशेष केले नाही. ही शहिदांना श्रद्धांजली आहे.कोंडवे – दांडवे हे गाव पुण्यापासून १४ किलोमीटर दूर आहे. कोंडवे – दांडवे गावाची लोकसंख्या ६५ हजारांपेक्षा जास्त आहे. हे गाव पुढच्या वर्षी पुणे मनपामध्ये समाविष्ट होणार आहे. सध्या या गावात अनेक निर्माण सुरू आहेत. या गावातील कित्येक कुटुंबातील तरुण सैन्यात भरती झाले आहेत.
