जनतेज न्युज

नागपूर च्या शाळेत 38 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह – दीपक सेलोकर , आरोग्य अधिकारी

प्रतिनिधी , नागपूर : नागपूर च्या  एका शाळेत 38 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची मोठी चिंता वाढली त्या शाळेमध्ये चाचण्या  करण्याचे आदेश देण्यात आले असून विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग  सुद्धा केलं जात आहे..सगळी मुलं लक्षण नसलेले आहेत त्यांची आणखी टेस्ट केली जाणार आहे सोबतच इतर शाळांना सुद्धा सावधतेचा इशारा देत कोरोना नियमांचं  पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितलं… शहरामध्ये कोरोनाचे प्रमाण वाढत असल्याने लक्षणे वाटल्यास प्रत्येकाने टेस्ट करावी आणि लस घ्यावी ज्यांचे  दोन डोस झाले त्यांनी बूस्टर डोस घ्यावा अशा सूचना सुद्धा आरोग्य अधिकाऱ्यांनी केल्या