प्रतिनिधी, मुंबई : सकिनाका परिसरात प्रेमप्रकरणातून एका २२ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्ती नसीम शेख याची बायको रुबिना शेख आणि भाचा मोहम्मद सैफ जुल्फेकार फारुकी यांचे प्रेमसंबंध होते असा संशय नसीमला होता. म्हणून, नसीम ने रुबिनाचा शारीरिक व मानसिक छळ करायला सुरुवात केली. या सर्व त्रासाला कंटाळून रुबिनाने प्रियकर मोहमद फारुकी याच्या मदतीने नसीम याचा गळा दाबून हत्या केली.
साकीनाका पोलीस ठाणेत अजगरअली अल्लारखे शेख या ४८ वर्षीय व्यक्तीनी तक्रारी दाखल केली. सुन रूबीना शेख व तिचा प्रियकर साथीदार यांनी संगनमत करून २२ वर्षीय मुलगा नसीम शेख याला वैयक्तीक घरगुती भांडणावरून जिवे ठार मारून त्याचा मृतदेह घरातील लाकडी बेडमध्ये लपवुन ठेवला. या तक्रारी नंतर साकीनाका पोलिसांनी कलम ३०२, २०१, ३४ भादवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कुदळे, निगराणी पथक अधिकारी पोलीस उप निरीक्षक लोणकर तसेच पोलीस शिपाई बनसोडे यांनी दोन्ही आरोपींचा शोध घेतला.
तांत्रिक तपासाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या खात्रीलायक माहिती वरून शोध घेवून आरोपी रूबीना व तिचा प्रियकर मोहम्मद सैफ जुल्फेकार फारुकी यांना ताब्यात घेवून पोलीस ठाणेत आणले. रूबीना व सैफ यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने कौशल्यपुर्वक विचारणा केली असताना तीने व तिचा प्रियकर मोहम्मद सैफ जुल्फेकार फारूकी याच्याशी संगनमत करून नसीम शेख याचा गळा दाबुन खून केल्याचे सांगितले. त्यावरून दोन्हीही आरोपींना हत्येच्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. नसीम शेख हा रूबीनाच्या चारीत्र्यावर संशय घेवून तिचा शारिरीक व मानसिक छळ करत असल्याने छळाला कंटाळून तिने हा गुन्हा केला असल्याचे तपासात सांगितले आहे.
