प्रतिनिधी, जळगाव : चोपडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती दिली होती या विश्रांतीन तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतातील काम उरकून घेतले परंतु काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने वातावरणात उष्णता निर्माण झाली होती या उष्णतेमुळे नागरिक घामाने हैराण झाले होते परंतु आज दिवसभर ढगाळ वातावरण आकाशात निर्माण झालेला होत संध्याकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली त्याचपणे बाजारात हात गाडी वर फळांची विक्री करणाऱ्यांची देखील धावपळ झाली मात्र या पावसाने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे व नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून बचाव होणार आहे.
