प्रतिनिधी, मुंबई : यंदा गणरायाचे स्वागत धुमधडाक्यात होणार आहे. दरवर्षीप्रमाणे भाविक लाडक्या बाप्पाची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्येच शिंदे भाजप सरकारने गणेशोत्सवावरील निर्बंध हटवून नागरिकांना दिलासा दिला. तर गणेशमूर्तिकार रात्रंदिवस मूर्ती घडवण्यात दंग झाले आहेत. यावेळेस तुलनेने मूर्तींची मागणी जास्त असल्याचे मूर्ती विक्रेत्यांचे म्हणणे आहे. तर शासन आदेश उशिरा आल्याने आधीच्या मर्यादेनुसारच मूर्ती घडवत असल्याचे सांगितले. तर आता जास्त उंचीच्या मूर्तीच्या येत असलेल्या मागणीनुसार कमीतकमी वेळेत मूर्ती बनवण्याची कसरत होत आहे, असे मूर्ती विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, गणेश मूर्ती प्रदर्षन फुलले आहे. मूर्ती खरेदीसाठी आतपासूनच बुकिंग सुरू करण्यात आली आहे. एकांदरीतच यावेळेस गणेशोत्सव हर्षोल्लाहासाने साजरा होणार आहे.
