प्रतिनिधी, जळगाव : चोपडा शहरात पावसाळ्यात पर राज्यातून परस बागेत व शोबिनीय फुलं तसेच फळांचे असे अनेक प्रकारचे रोप विक्री करण्यासाठी येत असतात परंतु यावर्षी चोपडा तालुक्यात संपूर्ण जून महिना काही प्रमाणात पाऊस सोडला तर बहुतेक तालुका कोरडा राहिला जुलै महिन्याचा पहिल्या आठवड्यात पावसाच्या आगमन झाले परंतु तोही आता गायब झाल्याने आकाशातून सूर्य ढगांच्या आड लपून ऊन सावलीच्या खेळ सुरू केला आहे. त्यामुळे रोप घेण्यासाठी नागरिकांनी प्रतिसाद देणे कमी केले यामुळे बिहार येथून आलेला रोप विक्रेता ग्राहकांची वाट पाहत बसलेला आहे. सदर रोप हे आंध्र प्रदेश व पुणे येथून आणत असल्याने विक्रीसाठी पन्नास रुपयांपासून ते सातशे रुपये पर्यंत रोप आहे. परंतु ग्राहक नसल्याने त्यांना चिंता सतावते आहे आणि पाऊस नसल्याने फुलांचे व इतर रोप यांना विकत पाणी घेऊन त्यांना टाकावे लागत असल्याचे रोप विक्रेता यांनी सांगितले.
