जनतेज न्युज

कासेगावच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे गावाचा संपर्क खंडित

प्रतिनिधी, सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात मागच्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कासेगावच्या ओढ्याला पूर आला आहे.
त्यामुळे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्याने गावचा संपर्क खंडित झाला आहे.
कासेगावहुन दररोज लोक कामानिमित्त सोलापूरला येत असतात.
मात्र पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे हा संपर्क तुटल्याच दिसून येत आहे.