प्रतिनिधी, अमरावती : अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय इर्विन येथील आयसीयू बेडची संख्या लवकरच वाढणार आहे. अमरावती जिल्ह्याला कोविडसाठी प्राप्त झालेल्या निधीतून आयसीयू बेडची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे इर्विन येथे नवीन ४० आयसीयू तर २१ पेडियाट्रिक आयसीयू बेड रुग्णांसाठी लावण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.कोविडसाठी प्राप्त निधीतून ४० आयसीयू व २१ पेडियाट्रिक आयसीयू बेडची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हे बेड रुग्णालयात बसविण्यात येणार आहे यासह ऑक्सिजन आणि एसीचे काम पूर्ण झाले आहे. रुग्णाच्या सेवेत या सोयी सुविधा लवकरच येणार असल्याची माहिती डॉ. नरेंद्र सोळंके यांनी दिली आहे.
