जनतेज न्युज

राष्ट्रप्रेमींनी जपली तीन दशका पासुन अनोखी परंपरा;अभिवादनाने उजळले हुतात्मा स्मारक

प्रतिनिधी, बुलडाणा : गेल्या तीन दशकांपेक्षा अधिकची अनोखी परंपरा असलेल्या व भारत विद्यालयाचे संस्थापक स्व.हर्षवर्धन आगाशे यांनी सुरवात केलेल्या शहरातील हुतात्मा स्मारकावर शहीदांना अभिवादनाची परंपरा यावर्षी ही शेकडो मेणबत्ती प्रज्वलीत करत क्रांतिदिनी शाहिदांना अभिवादन करण्यात आले.. रात्री हुतात्मा स्मारकावर एकत्र येत राष्ट्रप्रेमी नी अभिवादन करत मागील 35 वर्षांची परंपरा अखंडीत ठेवत शहीदांप्रतिची कृतज्ञता व्यक्त केली आहे..यावेळी एडेड हायस्कूल समोरील हुतात्मा स्मारकावर ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले..मेणबत्त्यांच्या प्रकाशात हे अभिवादन उजळून निघाले होते.. स्मारकासमोर मेणबत्त्या प्रज्वलीत करण्यात आल्या.. राष्ट्रगीताने अभिवादन कार्यक्रमाची सांगता झाली.. यावेळी रविकांत तुपकर ,रणजितसिंह राजपूत, चंद्रशेखर जोशी, डी. एस लहाने, अरविंद होडे, शिवाजी तायडे, अशोक काळे, गजानन नाईकवाडे, रविकिरण टाकळकर, जयंत दलाल, अभिलाष चौबे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती.