प्रतिनिधी , सोलापूर : सोलापूर मध्ये सध्या आम आदमी पार्टी सक्रिय होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी युवा आघाडी सोलापुरची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे आयोजन निलेश संगेपाग यांनी केले. आणि या बैठकीस आम आदमी पार्टी महाराष्ट्र युवा आघाडी प्रदेश अध्यक्ष अजिंक्य शिंदे, आम आदमी पार्टी महाराष्ट्र युवा आघाडी संघटक संदीप सोनावणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांचे युवकांना उतृष्ट मार्गदर्शन लाभले. यावेळी निलेश संगेपाग यांच्या नेतृत्वात अनेक युवकांचे पक्ष प्रवेश देखील पार पडले. तसेच येणाऱ्या सोलापूर महानगर पालिका निवडणुकिंमध्ये आम आदमी पार्टी युवा आघाडी आपला ठसा उमटविणार. असे मत आम आदमी पार्टी महाराष्ट्र युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
