प्रतिनिधी , औरंगाबाद : जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असून आज भाजपाचे आमदार अतुल सावे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली तर त्याच बरोबर शिंदे गटाचे आमदार संदिपान भुमरे आणि आमदार अब्दुल सत्तार यांची मंत्री पदासाठी वर्णी लागली आहे. भाजपाचे आमदार अतुल सावे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न आणि रस्त्यांसंदर्भातील समस्या ही लवकरात लवकर सोडवण्यासाठी मोठी मदत होणार असल्याची प्रतिक्रिया आज रोजी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या शहर उपाध्यक्ष माधुरी देशमुख यांनी पत्रकारांची बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आमदार अतुल सावे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने भाजपा कार्यालयात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला असून यावेळी महिला आघाडीच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला यावेळी बोलताना माधुरी देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
