प्रतिनिधी , ठाणे : देशाचे पंतप्रधान यांच्या हर घर तिरंगा तिरंगा या संकल्पनेतून प्रत्यके घरावर ध्वज फडकवला जावं यासाठी आज ठाण्यातील भाजप कडून रॅली यात्रा काढण्यात आली होती. यावेळी भाजप कडून हातात तिरंगा ध्वज घेऊन ठाण्यातील अनेक ठिकाणी रॅली काढण्यात आली. राष्ट्र अभिमान जागृत करण्यासाठी हे अभियान अतिशय महत्त्वाचा महोत्सव आहे. या अभियानाच्या माध्यमातून कोपरी मध्ये भव्य रलीचे आयोजन केले होते. भाजप सलाम सेल चे अध्यक्ष कृष्णाजी भुजबळ यांनी या कोपरीच्या भव्य रॅली चे आयोजन केले होते. या भव्य रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचे परेड चे देखील आयोजन करण्यात आले होते. यात सर्व भारतीय जात पात आणि जातीय धर्म बाजूला ठेऊन या अमृत महोत्सव मध्ये सहभागी होतील असा विश्वास भाजप विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.
