जनतेज न्युज

आगामी काळात प्रस्तापितांच्या विरुध्द लढा तीव्र करणार

प्रतिनिधी, औरंगाबाद : प्रा. किसन चव्हाण गेल्या वर्षभरापासून सर्व सामान्यांच्या हक्कासाठी शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील गावागावात घोंगडी बैठकांचे आयोजन करुन न्यायासाठी लढा देत असतात. तालुक्यातील प्रस्थापित राजकर्त्यांकडून माझा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे, असे किसन चव्हाण यांनी म्हंटले. आगामी काळात प्रस्तापितांच्या विरुध्द लढा तीव्र करीत असतांनाच साखर सम्राटांची मक्तेदारी संपवून सर्व सामान्यांचा अन्याय दुर करण्यासाठी ईडीमार्फत साखर कारखान्यांची चौकशी करण्याचा इशारा वंचित चे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांनी दिला. त्याचबरोबर त्यांनी पुढे म्हटले की, माझ्या अंगातच पारधी आणि वंजाऱ्याचं रक्त आहे. तुम्हाला आगामी निवडणुकी मध्ये पारधी आणि वंजारी काय असते ते दाखवून देऊ. आमदार मॅडम बचा सखे तो बचालो. असा खणखणीत इशारा आमदार राजळे यांना दिला. खानापूर येथील खोट्या गुन्ह्यामध्ये प्रा किसन चव्हाण यांचे नाव टाकल्याच्या नंतर चव्हाण यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून आपण शुक्रवारी सकाळी शेवगाव पोलिसांमध्ये हजर होणार असल्याचे सांगितले. त्यांच्या समर्थकांनी त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून त्यांना पोलीस ठाण्यात हजर केले. यावेळी त्यांचे हजारो समर्थक उपस्थित होते. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यांच्या अटकेचा निषेध ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. पाथर्डी, जामखेड, नेवासा, बीड अश्या विविध ठिकाणावरून महिला व पुरुष पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शेवगाव पोलीस ठाण्यात आल्यानंतर जमावाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी भडक्या विमुक्त जाती चे राज्य अध्यक्ष अॅड अरूण आंबा जाधव, धर्मानंद साळवे, बीड जिल्हा उपाध्यक्ष भारत तांगडे, संजय कांबळे, पाथर्डी तालुका महासचिव, अरविंद सोनटक्के, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष भोरू म्हस्के, पाथर्डी तालुका अध्यक्ष शेख बंन्नूभाई, जिल्हा संघटक पाथर्डी तालुका अध्यक्ष सुनीता जाधव, पण.प्रशांत भराट, ता अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, क्राॅम्रेड संजय नांगरे, शेवगाव तालुका अध्यक्ष, प्रहार शेवगाव तालुका अध्यक्ष रामजी शिदोरे, जेष्ठ समाज सेवक विनायक देशमुख गुरूजी,कुषी उत्पन्न बाजार समितीचे मा सभापती गहिनीनाथ कातकडे, संजय कांबळे, पाथर्डी तालुका महासचिव, अनिल जाधव अहमदनगर उत्तर महासचिव, संजय चव्हाण सर,पाथर्डी वंचित माहिला अध्यक्ष,रोहिणी ठोंबे, महिला उपाध्यक्ष, इत्यादी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. ही सभा सुमारे साडेतीन तास चालली. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकारी यांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय कर्हे यांनी येथील कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठापर्यंत पोहोचविल्या जातील. असे कार्यकर्त्यांना आश्वासित केले. यावेळी राजू नाईक, संगिता ढवळे, शेवगाव ता महिला ता अध्यक्ष, लक्ष्मण मोरे,सागर हवाले,सलिम शहा, पप्पू शेठ गर्जे, रवींद्र निळ,विजू अंकल गायकवाड,सागर गरूड,युवा ता अध्यक्ष, सोपानराव काळे ता उपाध्यक्ष शेवगाव, रमेश खरात कामगार संघटना अध्यक्ष, डॉ अंकुश गायकवाड, डॉ बाशिट, शेख सलीम गिलानी, यावेळी प्रास्ताविक वंचित बहुजन आघाडी चे शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल व आभार हरिशदादा चक्रनारायण यांनी मानले. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.