प्रतिनिधी , ठाणे : कळवा येथे एसी लोकलच्या विरोधात सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांनी कुठलेही नेतृत्व नसताना आंदोलन छेडल्यानंतर आता हे आंदोलन भविष्यात चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विषयावरून कळवा येथील अनेक प्रवाशांनी स्थानी आमदार आणि माजीमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आव्हाड यांनी हे आंदोलन धरून ठेवणार असल्याचे सांगितले. यावेळी आव्हाड यांनी सर्व सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. त्यानंतर आज ठाण्यातील मुंब्रा येथे आव्हाड यांनी मुंब्रा प्रवश्यांसोबत बैठक पार पडली. यावेळी आव्हाड यांनी सांगितले की मी रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलो असतं त्या ठिकाणी शंभर हून अधिक बंदूकधारी त्याठिकाणी माझ्या बाजूला उभे होते. लोकशाही मध्ये अशा प्रकारे एका लोकप्रतिनिधी आहे. अधिकाऱ्यांची वेळ घेऊन भेट घेण्यासाठी गेलो असताना मशीन गन घेऊन घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र घबरवण्याचा प्रयत्न करू नका याला कोणी घाबरणार नाही असे आव्हाड यांनी सांगितले. पोलीस लावायचे मशीन गन घेऊन यायचं हे रेल्वे प्रवासी आहेत अतिरेकी नाहीत हे महाराष्ट्र आहे कश्मीर नाही. बंदूक दाखवतात बंदुकीला कोण घाबरत नाही. बंदुकीची एकदा मारलं ना? गोळी एकदा लागेल आणि एकाला गोळी लागली तर हजार गोळी खायला रस्त्यावर उतरतील आणि तेवढ्या गोळ्या तुमच्याकडे नसतील असा इशारा प्रशासनाला आव्हाड यांनी दिला आहे.भविष्यात सर्व साध्या लोकल बंद करणार आहेत. लोकशाही मध्ये ९० टक्क्यालाच महत्व असते
