जनतेज न्युज

आमदारांनी लावली मासरुळ सर्कल मधील कामांची चौकशी

प्रतिनिधी, बुलडाणा : बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा तालुक्यातील मासरूळ जिल्हा परिषद सर्कल मधील झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी लावली आहे, त्यासाठी आमदार गायकवाड यांनी नुकतीच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विसपुते यांची भेट घेऊन, चौकशीसाठी एक समिती नेमण्याची मागणी केली, आणि त्यानुसार उप जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी, त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे अधिकारी, अश्या अधिकाऱ्यांची समिती गठित करून, येत्या आठवड्यामध्ये या संपूर्ण कामाची चौकशी केली जाणार आहे, या सर्कल मध्ये काम न करताच बिले काढली गेली, त्याचबरोबर एका कामावर चार चार योजनेचा पैसा खर्च करण्यात आला, असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी करत, संबंधित व्यक्तींवर शासनाची फसवणूक केल्या संदर्भात गुन्हे दाखल करून, त्यांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याकडून रिकव्हरी केली जाणार आहे. तर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कुचराई केल्यास, त्यांच्यावर देखील राज्याच्या मुख्य सचिवांमार्फत कारवाईचा इशारा यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.