प्रतिनिधी, जालना : काल NIA ने देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी करून या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना टेरर फंडिंगप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले.जळगाव मधूम अटक करण्यात आलेल्या अब्दुल हादी,अब्दुल रौफ याला आज जालना शहरातील रहिमान गंज भागात चौकशी साठी आणण्यात आले होते.दरम्यान या वेळी पॉप्युलर फ्रंटची कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत NIA GO BACK च्या जोरदार घोषणाबाजी करत विरोध केलाय दरम्यान NIA आणि ATS कडून या प्रकरणी कसून चौकशी केल्या जात असून त्यांच्या घराची ही झाडाझडती घेतली आहे. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठिचार्ज केला.
