जनतेज न्युज

उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला मोठ केले आहे – शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

प्रतिनिधी , औरंगाबाद : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आता जर उलट सुलट बोलाल तर याद राखा असा थेट इशारा नारायण राणे यांना दिला आहे. तसेच तुमची शुगर आधीच खूप वाढली आहे अजून वाढू देऊ नका असा सल्लाही त्यांनी नारायण राणे यांना दिला आहे.उद्धव ठाकरे हे सूर्यासमोर दिवा असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज औरंगाबाद येथे यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी त्यांना प्रतिउत्तर दिल्या असून सूर्य हा तळपत असतो तर दिवा नेहमी पेटत असतो असे वक्तव्या खैरेंनी केले आहे. त्यांनी टीका टिप्पणी केल्यापेक्षा बाकीचे विकासाचे कामे करावे असा सल्ला खैरेंनी बावनकुळे यांना दिला. सुर्य तळपत असतो आणि दिवा पेटत असतो. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे बावनकुळे यांना प्रत्युत्तर