प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : महाराष्ट्र राज्य शिक्षक क्रांती संघटनेच्या उल्हासनगर शाखेच्या वतीने माजी शिक्षक आमदार दिवंगत रामनाथ मोते यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले. रामनाथ मोते हे कोकण शिक्षक मतदारसंघातून दोनदा विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस म्हणाले कि येत्या शिक्षक आमदार निवडणुकीत संघटनेतर्फे योग्य नेतृत्व देण्यात येईल.
