जनतेज न्युज

टोल भरण्यासाठी थांबलेल्या अनेक वाहनांना डम्परची धडक

प्रतिनिधी , मुंबई : नवी मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या वाशी येथील टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या 10 ते 12 वाहनांना मागून येणाऱ्या भरधाव डंपर ने धडक दिली. या धडकेत 2 नागरिक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. तसेच या धडकेत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मर्सिडीज, इको, वॅगनआर अशा चार चाकी गाड्यांचा समावेश आहे. भरधाव डम्परचे ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला असल्याचे समजते.