प्रतिनिधी, यवतमाळ : पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे शेतकर्यांनच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आता शेतात उभे असलेले पीक जगविण्याचा शेतकर्यां कडून आटापिटा केला जात आहे. परंतु, पुन्हा बोंडअळीचे संकट गडद झाले आहे. जिनिंगसह परिसरात फेरोमन ट्रॅप लावण्याचे आदेश जिल्हाधिकार्यां नी दिले. त्याकडे जिनिंग मालकांनी पाठ फिरविली आहे. मागील चार वर्षांपासून कापूस पिकावर सातत्याने बोंडअळी येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. शेतात कपाशीला बोंड दिसत असले तरी त्यात बोंडअळी राहत असल्याने कापूस फुटत नाही. बोंडअळीचे संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात फेरोमन ट्रॅप लावणे गरजेचे आहे. काही शेतकरी बोंडअळीपासून पिकांची सुरक्षा करण्यासाठी फेरोमन ट्रॅप लावतात. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील जिनिंग मालक जिनिंग मध्ये फेरोमन ट्रॅप न लावता शेतकऱ्यांशी खेळत आहे. जिल्ह्यात 56 जिनिंग आहे. त्या सर्व जिनिंग सह दोन किलोमीटर परिसरात फेरोमन ट्रॅप लावण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. बोटावर मोजण्या इतक्याच जिनिंग मालकांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. इतरांनी फेरोमन ट्रॅप न लावता जिल्हा प्रशासनाचा आदेश धुडकावून लावला आहे. बोंडअळी जिनिंग मधून पसरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिनिंगसह दोन किलोमीटरच्या परिसरात फेरोमन ट्रॅप लावणे आवश्यक आहे. असे केल्यास कपाशीवर येणाऱ्या बोंडअळीपासून पिकाला वाचवता येईल. परंतु, या खरीप हंगामात बोंडअळीचे संकट घोंगावत असताना कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.
बोंडअळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतात फेरोमन ट्रॅप लावले पाहिजे,तसे निर्देश कृषी विभागाला देण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात 56 जिनिंग आहे. त्यांनाही फेरोमन ट्रॅप लावण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी फेरोमन ट्रॅप लावल्यास बोंडअळीपासून होणारे नुकसान टाळता येईल.खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाची अतिवृष्टीमुळे नासाडी झाली आहे. शेतकरी संकटात सापडले असताना गुलाबी बोंडअळीचे संकट गडद झाले आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येत नाही. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभागाने पुढाकार घ्यावा.पार्वती कोटेक्स जिनिंगकडून दरवर्षी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन केले जाते. कंपनीचे प्रतिनिधी येऊन फेरोमन ट्रॅप लावून देतात. जिनिंग एमआयडीसी परिसरात आहे. चार किलोमीटर अंतरावर जंगल,औद्योगिक वसाहत आहे. शेती नाही. जिनिंग मध्ये फेरोमन ट्रॅप लावले पाहिजे.
