जनतेज न्युज

वैजापूर तालुक्यात भगरीचा कहर.शेकडो नागरिकांना विषबाधा

प्रतिनिधी, औरंगाबाद : लासूर स्टेशनच्या पाठोपाठ भगरीमुळे आता वैजापूर तालुक्यालाही विषबाधेचा विळखा लागला आहे.उपवासाची भगर खालल्याने तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांना विषबाधा झाल्याचे सोमवार(ता.२७)रोजी उघडकीस आले.तालुक्यातील बहुतांश रुग्णालये भगरीमुळे विषबाधा झालेल्या रुग्णांनी पूर्णतः भरली आहे. वंजारगाव,कापूसवडगाव,भगूर,टेंभी,महालगाव,हडसपिंपळगाव,चोरवाघालगाव,शहरातील शास्त्रीनगर,सावतानगर या भागातील भाविकांना भगरीमुळे विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे.शेकडोच्या संख्येने शहरातील व ग्रामीण भागामध्ये रुग्ण उपचार घेत आहे.या घटनेची माहिती मिळताच वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी तात्काळ रुग्णालयात भेट देत रुग्णांच्या प्रकृतीचा आढाव घेतला.नवरात्रीच्या उत्सवात भाविक उपवास धरतात,सद्याच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भाविकांनी उपवासात भगर खाणे टाळावे असे आवाहन आ.रमेश बोरनारे यांनी वैजापूर तालुक्यातील नागरिकांना केले आहे.