जनतेज न्युज

गांधी जयंतीनिमित्त अमरावती मध्ये नमन सद्भावना यात्रेचे आयोजन

प्रतिनिधी, अमरावती : आज 2 ऑक्टोबर जागतिक अहिंसा दिवस महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती निमित्त आज शहरात सर्व धर्मीय प्रार्थना आणि गांधी नमन सद्भावना यात्रा राजकमल चौक ते जयस्तंभ चौकापर्यंत नमन यात्रा काढण्यात आली. सर्व धर्मीय प्रार्थना हिंदू, मुस्लिम शेख, जैन, ख्रिश्चन, बुद्ध या धर्म प्रतिनिधी द्वारे करण्यात आली. सर्व धर्मीय प्रतिनिधी व सर्व जमलेल्या लोकाद्वारे संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला सामुदायिक हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.प्रेम, सद‌भावना, अहिंसा यातून तो विकास शोधतो है सत्य, स्वीकार गरजेचा असून सर्व धर्मातील विश्व कल्याणाची शिकवण हेच प्रार्थनेच्या माध्यमातून साधून परस्परातील मतभेद दूर घेऊन बंधूभाव स्थिर साधता येईल. महात्मा गांधी जयंती निमित्त लहान मुलांनी वेशभूषा मध्ये महात्मा गांधीजींना अभिवादन केले.