जनतेज न्युज

दसऱ्या मेळाव्यासाठी कल्याण डोंबिवलीतून 25 हजार कार्यकर्ता मेळाव्याला जाणार

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : शिंदे गटाचा 20 हजार कार्यकर्त्यांचा दावा तर ठाकरे गटाचा ही पाच हजार कार्यकर्त्यांचा दावा शिंदे गटाकडून 600 बसेस बुक तर ठाकरे गटाचा वाहतूक कोंडी मुळे रेल्वेचा प्रवास पाच तारखेला मुंबईत शिवसेना आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. अशातच दोन्ही गटाकडून जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यासाठी कल्याण डोंबिवली व कल्याण ग्रामीण भागातून 25 हजार कार्यकर्ते जाणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे गट व शिंदे गटाकडून केला जात आहे यात शिंदे गटातील कल्याण लोकसभा जिल्हा प्रमुख याच्या माहिती नुसार कल्याण डोंबिवली व कल्याण ग्रामीण परिसरातून सुमारे 20 हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते शिंदे गटाच्या बीकेसी मेळाव्यात येथे जाणार असल्याचे सांगत , 600 बसेस बुक केल्याचा दावा केला असून बाळासाहेबांच्या विचारांचे तसेच राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्वाचे विचारांचे सोनं लुटण्यासाठी जाणार असल्याचा दावा केला आहे .
तर ठाकरे गटाकडून वाहतूक कोंडीचा अनुभव पाहता या वेळेस ट्रेनचा प्रवास करत कल्याण डोंबिवली व कल्याण ग्रामीण परिसरातून कार्यकर्ते शिवाजी पार्क येथील दसऱ्या मेळाव्या साठी जाणार असल्याची दावा केला जात आहे