प्रतिनिधी , वर्धा : वर्धा जिल्हा लोकसभा क्षेत्रातील खासदार रामदास तडस यांच्या सततच्या पाठपुरावा मुळे ट्रेन नंबर 12160/59 अमरावती जबलपूर एक्सप्रेस ला सिंदी येथे थांबा मिळाल्या आज त्यांचे आणि हिंगणघाट आमदार समीर कुणावर यांचे स्वागत सिंदी शहर रेल्वे स्थानकावर करण्यात आले.कोरोना काळात बंद पडलेली अमरावती जबलपूर एक्स्प्रेस आजपासून अमरावती जबलपुर एक्स्प्रेस सिंदी रेल्वे येथे नियमित सुरू झाली त्यानिमित्ताने सिंदी रेल्वे स्थानकांवर एक्स्प्रेसचे स्वागत खासदार रामदास तडस आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी शुभारंभ साठी सर्व सिंदी शहर चे सर्व पक्षीय कार्यकर्ते व बंधू / भगिनी सर्व प्रवासी मित्र मंडल व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
