जनतेज न्युज

शिंदे फडणवीस सरकार मधील आमदारांची अस्वस्थता बाहेर पडू लागली – एकनाथ खडसे

प्रतिनिधी, जळगाव : शिंदे फडणवीस सरकारमधील आमदार हे मंत्रिमंडळाची वाट पाहत असून मंत्रिमंडळाच्या विस्ताराला जस जसा उशीर होतोय तस तशी अस्वस्थता वाढू लागली आहे वाताही अस्वस्थता उघडपणे बाहेर पडत असून मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार यासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. तर गिरीश महाजनांनी एक हजार कोटींचे काम रद्द केल्याने सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी असल्याचेही एकनाथ खडसे म्हणाले.