जनतेज न्युज

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे पालिका एन विभाग च्या कार्यालया समोर ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आज घाटकोपर मधील पालिका एन विभाग च्या कार्यालय ला भाजप कार्यालय असे बोर्ड लावण्यात आले. घाटकोपर पूर्व येथील आचार्य अत्रे या मैदानामध्ये छटपूजेची परवानगी राष्ट्रवादीने महानगरपालिका कडून घेतली होती. मात्र आता अचानक भाजपाला मैदानात परवानगी देण्यात आली आणि राष्ट्रवादीला त्यांचा परवानगीचा अर्ज नाकारण्यात आला आहे. असा आरोप राष्ट्रवादी च्या मुंबई कार्याध्यक्ष यांनी या वेळी केला आहे.पालिका एन विभाग च्या समोर राखी जाधव आणि राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन करीत पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत एन वॉड च्या सहाय्यक आयुक्तांच्या राजीनामाची मागणी केली.