जनतेज न्युज

चोपड्यात भाऊबीज साठी लागणाऱ्या साखरेच्या नारळ बनविण्यात कारागीर मग्न

प्रतिनिधी, जळगाव : दिवाळी दोन ते तीन दिवसावर आली असल्याने भाऊबीज ला मान असलेल्या साखरेच्या नारळ बनविण्यात कारागीर मग्न आहे गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर यावर्षी साखरेच्या नारळ बनविले जात आहे साखरेच्या नारळ बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल साखर कोळसा व मजुरी वाढल्याने हा व्यवसाय अडचणीत सापडलेला आहे दिवाळी येण्याच्या आठ दिवस आधी साखरेच्या नारळ बनविण्यास सुरुवात करीत असतात साखरेच्या नारळ ए फक्त भाऊबीजला विक्री केली जात असते त्यानंतर भाऊबीजच्या दिवस झाल्यानंतर या नारळाची विक्री होत नाही हा व्यवसाय फक्त बारा ते पंधरा दिवसांचा असतो आता दोन वर्ष कोरोनाचा गेल्यानंतर यावर्षी व्यवसाय कसा होतो हे तर सांगता येत नाही परंतु पारंपारिक व्यवसाय असल्याकारणाने साखरेच्या नारळ बनविण्यात सर्व कारागीर महिला पुरुष मग्न दिसत होते.