जनतेज न्युज

खासगी बसच्या अव्वाच्या सव्वा भाडेवाढीला बसणार चाप ; उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून भाडे निश्चित

प्रतिनिधी, बुलडाणा : दिवाळीला खासगी बस मालकांकडून माेठ्या प्रमाणात भाडे वाढ करण्यात येते..दुप्पट ते तिप्पट भाडे वसूल करून खासगी बस मालक प्रवाशांची लूट करतात.आता खासगी बस मालकांकडून हाेणाऱ्या या लुटीला आता चाप बसणार आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी अधिकतम भाडे जाहीर केले आहे. यापेक्षा जास्त भाडे आकारल्यास बस मालकांवर कारवाई करण्याचा इशारा आरटीओंनी दिला आहे. सण, उत्सवाच्या काळात सूरत,नागपूर, पुणे, मुंबईकडे राहणारे प्रवाशी आपल्या गावी जातात, तसेच दिवाळी झाल्यानंतर गावी आलेले प्रवाशी माेठ्या शहरांकडे जातात. त्यातही दिवाळीत प्रवाशांची माेठी गर्दी पाहता, खासगी बसच्या मालकांकडून माेठ्या प्रमाणात भाडेवाढ करण्यात येते. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागताे.. बुलडाणा शहरात रेल्वे नसल्याने मुंबई, पुणे येथे जाण्यासाठी खासगी बसचाच आधार घेतला जातो..हीच संधी साधून खासगी बसचे मालक भाड्यांमध्ये दुप्पटीने वाढ करतात. प्रवाशांची हाेणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी विविध शहरांचे अधिकतम भाडे निश्चित केले आहे. यापेक्षा जास्त भाडे घेतल्यास प्रवाशांनी तक्रार करण्याचे आवाहन गाजरे यांनी केले आहे.तर गर्दीच्या हंगामात खासगी वाहन मालकांनी निर्धारित भाड्यापेक्षा जास्त भाडे मागितल्यास प्रवाशांना उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येणार आहे. बुलडाणा आरटीओ कार्यालयाच्या dyrto.28-mh@gov.in या ईमेलवर तक्रार करता येणार आहे..